कोल्हापूर – मलकापूर-पेरिड येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे वनस्पतीजन्य पर्यावरणपूरक रंगांचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनात बी. एस्सी. भाग १ आणि २ च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी पळस, काटे सावर, तुमा, हळद, बोगनवेल, कॉफी, झेंडू, गोकर्ण, गुलाब, पालक, शेंदरी, बीट या झाडांच्या पाने, फुले, फळे, खोडापासून गुलाबी, केशरी, पिवळा, हिरवा, निळा, चॉकलेटी आदी विविध रंग बनविले होते. या रंगांविषयी विद्यार्थ्यांनी माहिती दिली.
या उपक्रमाची संकल्पना वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मकरंद ऐतवडे यांनी त्यांचे सहकारी डॉ. पांडुरंग बागम यांच्या मार्गदर्शनाने राबविली. यावेळी नॅक समन्वयक प्रा. डॉ. एस. बी. पोरे, पी. एस. नाईक आणि डॉ. के. आर. खरात उपस्थित होते. या विद्यार्थी आणि विषयकेंद्रित उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांचे प्रोत्साहन लाभले. या उपक्रमास सुधाकर जायगडे, मुबारक मोमीन आणि विष्णू पुजारी यांचे सहकार्य मिळाले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.