पावसाची तीव्रता कशी राहील ? यावर माणिकराव खुळे यांचे स्पष्टीकरण
आजपासुन २५ ते २७ सप्टेंबर(बुधवार ते शुक्रवार)पर्यन्तच्या पुढील ३ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात वीजा व गडगडाटीसह जोरदार ते अति जोरदार परतीच्या पावसाची शक्यता जाणवते. मराठवाडा व विदर्भात मात्र ही परिस्थिती रविवार दि. ३० सप्टेंबर पर्यन्त टिकून राहण्याची शक्यता जाणवते.
२-छत्तीस तास अतिजोरदार पावसाचे १६ जिल्हे –
आज दि.२५(बुधवार)ची रात्र व दि.२६(गुरुवार)चा दिवस व रात्र असे ३६ तास
रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई उपनगर ठाणे पालघर नंदुरबार धुळे नाशिक नगर पुणे सातारा छ. सं.नगर जालना बीड अश्या १६ जिल्ह्यात अंदाजे १२ ते २० सेमी. दरम्यानचा अति जोरदार किंवा काही ठिकाणी २० सेमी पेक्षाही अधिक अश्या अत्याधिक जोरदार परतीच्या पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः मध्य महाराष्ट्रातील पर्जन्यच्छायेतील प्रदेशात ह्या परतीच्या पावसाचा जोर ह्या ३६ तासात अधिक जाणवेल.
३-पुरजन्य परिस्थिती👇
कोकणातील मुंबई शहर व उपनगर, ठाणे व उपनगर, पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अश्या ७ जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर अश्या ६ जिल्ह्यात अश्या एकूण १३ जिल्ह्यातील तापी, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात येत्या तीन दिवसात पूर परिस्थिती जाणवू शकते, असे वाटते.
४- पावसाचा जोर कधी कमी होण्याची शक्यता
खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर व सोलापूर अश्या १० जिल्ह्यात शनिवार दि. २८ सप्टेंबरपासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक
माणिकराव खुळे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.