June 11, 2025
Sandeep Jagtap Poem on heavy rains in Summer
Home » उन्हाळ्यात सुरू झालेल्या पावसाळ्याने
कविता

उन्हाळ्यात सुरू झालेल्या पावसाळ्याने


त्यांनी
एक कवी संमेलन भरवलय
अन् मला कविता वाचायला बोलवत आहे
आयोजकांना माहित नाही
इथं माझ्या कवितेची हिरवी ओळ
अवकाळीत सडत पडलीय..

बागेवर डाऊनी, करपा
द्राक्षाचा येणारा हंगाम पाण्यात
वावराचं कुरण झालंय
पेरणीला वाफसा लय लांबची गोष्ट
इथं मशागतीलाच पाऊस सवड देईना..

मळ्यातल्याच शंकर आप्पाची
नवी खोदलेली विहिर वळवात
दरडी सारखी कोसळली..
त्यांचे काढणीला आलेले कांदे
वावरातच सडले..
वारकरी आप्पाच्या डोळ्यात
पहिल्यांदाच पाणी पाहिलं ..

स्वतःच्या.. शेजारच्या ... पाहुण्या रावळ्यांच्या
कोणत्याही गावाला फोन करून खबर घेतली
तर उन्हाळ्यात सुरू झालेल्या पावसाळ्याने
सोलपटून काढल्याचाच विव्हळ येतो..

अन् ते मला कविता म्हणायला बोलावताय

त्यांना वेळप्रसंगी
कवीने घातलेला कुर्ता ,कोट
या सोबत
त्याच्या काळजावरच्या
जखमा सुद्धा दिसायला हव्यात..

- संदीप जगताप,
चिंचखेड ता. दिंडोरी, जि. नाशिक
संपर्क - 7218625960

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading