कोल्हापूर – येथील श्री गजानन महाराज प्रतिष्ठान आयोजित राऊत परिवार पुरस्कृत शब्दांगण ‘साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहे. या पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी ( १५ ऑगस्ट, २०२५ ) दुपारी तीन वाजता भवानी मंडप येथील करवीर नगर वाचन मंदीरात होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री नीलम्बरी कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह ग्रंथभेट असे आहे, अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा राऊत यांनी दिली आहे.
साहित्य पुरस्कार विजेते असे –
कादंबरी :
प्रथम पुरस्कार – काळीजकळा – डॉ. श्रीकांत पाटील, घुणकी
द्वितीय पुरस्कार – अंकितम् – धनश्री खाडे, तासगाव
तृतिय पुरस्कार – कीड – विशाल मोहोड, अमरावती
कवितासंग्रहः
प्रथम पुरस्कार – जामिनावर सुटलेला काळा घोडा – धनाजी घोरपडे
द्वितीय पुरस्कार – दिवस कातर होत जाताना – धर्मवीर पाटील, इस्लामपूर
तृतीय पुरस्कार -‘स्पार्टाकसी मरण आले तरी… – प्रमोद नारायणे वर्धा
चतुर्थ पुरस्कार – सृजना – अंजली मराठे – बडोदरा
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.