June 20, 2025
Dr. Jaysingrao Pawar launching the book “Ase Hote Aaple Shahu Maharaj” at Shivaji University Senate Hall on Shahu Jayanti, 2025.
Home » असे होते आपले शाहू महाराज
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

असे होते आपले शाहू महाराज

असे होते आपले शाहू महाराज या ग्रथांचा प्रकाशन सोहळा छत्रपती शाहू जयंती निमित्त दिनांक २६ जून, २०२५ रोजी सकाळी अकरा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शाहूंचे जेष्ठ अभ्यासक, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते आणि कुलगुरू दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेत याचे प्रकाशन होत आहे. यानिमित्ताने या ग्रंथा विषयी…

डॉ. अवनीश पाटील
प्रमुख, इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

असे होते आपले शाहू महाराज’ हे राजर्षी शाहू महाराजांचे नावीन्यपूर्ण चरित्र वाचताना तुम्हाला महाराजांच्या काळात फेरफटका मारत आहोत, असे वाटेल. डॉ. नंदकुमार मोरे यांनी अतिशय परिश्रमाने शाहू महाराजांचा चरित्रपट अतिशय सुबोध भाषेत साकारला आहे. महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग, त्यांचे विचार आणि त्यांनी केलेली मोठमोठी कामे तुमच्यासमोर गोष्टीरूपात मांडली आहेत.

शाहू महाराजांनी सामान्य माणसाला, गोरगरिबांना, स्त्रियांसह, शेतकरी आणि दलित-बहुजनांना न्याय मिळावा, त्यांना सन्मानाने जगता यावे; यासाठी खूप मोठे काम उभारले आहे. या कामाचे स्वरूप एका अभिनव पद्धतीने गोष्टीरूपात येथे वाचायला मिळेल.

शिक्षण हा समाज उभारणीचा पाया आहे, हे ओळखून महाराजांनी सर्व समाजाला अतिशय तळमळीने शिक्षण दिले. ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ हे त्यांचे ब्रीद वाक्यच होते. त्यामुळे या क्षेत्रात त्यांनी फार मोठे काम उभारले. ते संपूर्ण काम या चरित्रामध्ये अतिशय कौशल्याने समोर आणले गेले आहे.

राजर्षी शाहू महाराज स्वत:ला ‘शेतकरी’ म्हणवून घेण्यात धन्यता मानत. त्यांचे नाते शेती आणि शेतकऱ्यांशी होते. त्यांचा सर्वांमध्ये मिळूनमिसळून राहण्याचा आणि कौशल्याने कामे उभारण्याचा स्वभाव या चरित्रात साकारला गेला आहे. या पुस्तकातून महाराजांची जी प्रतिमा समोर उभी राहते, तीच मुळी ‘लोकराजा’ अशी आहे. त्यांची हीच प्रतिमा त्यांच्या कर्तृत्वाची ओळख होती. त्यामुळे ती यथामूल साकारण्यासाठी डॉ. नंदकुमार मोरे यांनी केलेले प्रयत्न अतिशय महत्त्वाचे ठरले आहेत. त्यामुळेच हे पुस्तक म्हणजे केवळ एका राजाची गोष्ट नाही, तर एका समाजसुधारकची, द्रष्ट्या नेत्याची आणि एका ‘लोककल्याणकारी राजा’ची गाथा ठरते.

हे पुस्तक तुमच्या मनातील राजर्षी शाहू महाराजांबद्दलचा आदर अजून वाढवेल. त्यांच्यासारखे काहीतरी चांगले, समाजहीताचे काम करण्याची प्रेरणा आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देईल, याची मला खात्री आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या १५० व्या जन्मवर्षाची आठवण म्हणून शिवाजी विद्यापीठाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांचे चरित्र प्रकाशित करण्याचा संकल्प केला होता. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने हे काम माझ्याकडे सुपूर्द केले. त्यानुसार असे होते आपले शाहू महाराज हे चरित्र लिहिले आहे. विद्यापीठाने सोपवलेली जबाबदारी माझ्यासाठी एक अनमोल संधी होती. ती मी खूप आनंदाने स्वीकारली आणि या चरित्र लेखनात काही प्रयोग केले. मराठीसह हा ग्रंथ इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती भाषांतरीत करण्यात आले आहे.

नंदकुमार मोरे
प्रमुख, मराठी विभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

पुस्तक – असे होते आपले शाहू महाराज
लेखक: नंदकुमार मोरे
प्रकाशक- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
पृष्ठे – १४४
मूल्य – रु ५०/-
साईज – क्राऊन
मुखपृष्ठ व आतील चित्रे – अन्वर हुसेन (४५ रेखाटने)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading