श्रीशब्द काव्य पुरस्कार जाहीर
नेज (ता. हातकणंगले ) येथील स्फूर्ती साहित्य संघ व पोतदार परिवार यांचेमार्फत कै. सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘ श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कार २०२३ ( प्रकाशन वर्ष २०२२) ची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक मधून बहुसंख्य कवींनी आणि प्रकाशकांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
यामधील पुरस्कार विजेते असे-
प्रताप वाघमारे (नागपूर) यांच्या सांजार्त या कविता संग्रहास प्रथम तर आबासाहेब पाटील, मंगसुळी यांच्या घामाची ओल धरून या कवितासंग्रहास द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला आहे. दोन्ही पुरस्कासाठी प्रत्येक १००० रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
विशेष पुरस्कार असे –
हर्षदा सुंठणकर, बेळगांव यांच्या कपडे वाळत घालणारी बाई, डॉ. दिलीप कुलकर्णी, कुरुंदवाड यांच्या अनुबंध, डॉ. सोनिया कस्तुरे,सांगली यांच्या नाही उमगत ती अजूनही, आशिष निनगुरकर, मुंबई यांच्या कुलूपबंद या कवितासंग्रहांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांना प्रत्येकी ५०० रुपये रोख स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अशी माहिती स्फूर्ती साहित्य संघाचे अध्यक्ष कवी डॉ.चंद्रकांत पोतदार यांनी दिली.
कवी बाबू पाटील यांच्या अध्यक्षतेमध्ये निवडसमितीने याकामी परीक्षक म्हणून काम पाहिले. २०२२, २०२३, २०२४ अशा तीन वर्षाचे पुरस्कार वितरण एकत्र समारंभपूर्वक मे, २०२४ मध्ये होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी दिली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.