दूधराज…
स्वर्गीय नर्तक किंवा स्वर्ग नाचण नावाने ओळखला जाणारा हा विहंग जमातीतला एक सुंदर जीव. ‘एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर’ असे या देखण्या पक्ष्याचे इंग्रजी नाव. रूपेरी -पांढरा रंग, चकाकणारे काळे डोळे, त्याच रंगाचा तुरा आणि सर्वात महत्त्वाचे लांबलचक फितीसारखी पिसे असलेली शेपटी.. या साऱ्यांमुळे हा पक्षी केवळ सुंदर दिसतो. तो हवेतल्या हवेत उडणारे कीटक मटकावतो यामुळे तो ‘फ्लायकॅचर’! या वेळी उडताना तो विलक्षण वेगाने गिरक्या घेतो, खाली-वर होतो. त्याचे हे उडणे एखाद्या नृत्यासारखे वाटते म्हणून तर त्याला विशेष नाव मिळाले ‘स्वर्गीय नर्तक….
सौजन्य – प्रतिक मोरे
Asian Paradise Flycatcher Photo Feature by Pratik More Asian Paradise Flycatcher Photo Feature by Pratik More Asian Paradise Flycatcher Photo Feature by Pratik More
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.