September 8, 2024
Call for Proposals for State Level Shabadshilp Literature Award 2023
Home » राज्यस्तरीय शब्दशिल्प साहित्य पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय शब्दशिल्प साहित्य पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

स्व. वत्सलाबाई वामनराव बोबडे आणि स्व. वामनराव बंडू बोबडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय शब्दशिल्प साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. सुहासकुमार बोबडे यांनी दिली आहे.

या पुरस्कारासाठी जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन, नाटक आणि आत्मकथन या साहित्य प्रकारातील प्रस्ताव मागविण्यात आले आहे. रोख रक्कम १००१ रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्काराचे वितरण स्व. वामनराव बंडू बोबडे यांच्या स्मृतीदिनी २५ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. तरी इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती, अल्पपरिचय आणि पासपोर्ट फोटोसह प्रस्ताव केवळ पोस्टानेच (कुरीयरने पाठवू नये) ३० एप्रिल २०२४ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन केले आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता – डॉ. सुहासकुमार बोबडे (भ्र.९४०३३४५३५१), ‘शब्दशिल्प’, अ/२७, रुक्मिणी गार्डन भाग – २, कराड, ता – कराड, जि – सातारा, पिन – ४१५११०


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मूलव्याध लक्षणे, कारणे अन् उपाय

भटकंती श्रीलंकेची…

स्थितप्रज्ञ व्हायचे म्हणजे नेमके काय ? 

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading