माय म्हणे लेक झाली
कुणी म्हणालं नवरात्रात जन्म
देवीचं देणं घेऊन आली…
तसं नव्हतं काहीच
लेकीचा जन्म दुर्दैवाची निशाणी
उगाच जन्माची वेळ..
केवळ मन समजावणी…
तसं त्या काळी
मी जन्मल्याबरोबर
उजळलं होत घर…
विजेचे दिवे लागून
अंधाराला हसलं होतं..
पण म्हणून ते कुठं
सगुणाचं ठरलं होतं…
लेकाचा पायगुण
लेकीचे कुठं गायचे
असतात गुण?
आईच्या माहेरी
बसायचा घट
भोवती गहू पेरून
हिरवी हिरवळ…
तुझा चालायचा
उदो उदोउदो
चढवून पानांची माळ
आरती घुमायची कानात
देवळात दीपमाळ
तुझं रूप मनामनात….
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.