वेगन’ प्रकारच्या खाद्यान्नाच्या श्रेणीतील वनस्पतीजन्य मांस उत्पादनांच्या पहिल्या खेपेतील माल गुजरातहून अमेरिकेला रवाना
नवी दिल्ली – वैशिष्ट्यपूर्ण प्रकारच्या कृषी प्रक्रियायुक्त अन्न उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, केंद्र केंद्र सरकारने निर्यात प्रोत्साहन क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात प्राधिकरणाच्या माध्यमातून गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियाद येथून अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये निर्यात करण्यासाठी ‘वेगन’ -म्हणजेच कुठलाही प्राणीजन्य घटक नसलेल्या खाद्यान्न श्रेणीतील वनस्पतीजन्य मांस उत्पादनांची पहिली खेप रवाना केली आहे.
विकसित देशांमध्ये वेगन प्रकारच्या अन्नपदार्थांची वाढती लोकप्रियता बघता, वेगन अन्न उत्पादनांमध्ये उच्च पोषण-मूल्ये आल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये वनस्पतीजन्य अन्न उत्पादनांच्या निर्यातीला प्रचंड वाव आहे. या प्रकारच्या उत्पादनांमध्ये तंतुमय घटकांची विपुलता आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण तुलनेने कमी असल्यामुळे, वेगन श्रेणीतील पदार्थ जगभरात प्रचलित अन्न पदार्थांना उत्तम पर्याय म्हणून लोकप्रिय होत आहेत.
नडियाद येथून अमेरिकेला निर्यात करण्यात आलेल्या पहिल्या खेपेत, मोमोज, छोटे समोसे, पॅटीस, नगेट्स, स्प्रिंग रोल्स, बर्गर, इत्यादी पदार्थांचा समावेश आहे. या मालाच्या वाहतुकीसाठी खेडा जिल्हा प्रशासनाकडून वाहतूकविषयक पाठबळ पुरविण्यात आले.
या पदार्थांच्या परदेशी निर्यातीसाठी नवनव्या ठिकाणांचा शोध घेण्याच्या गरजेवर भर देत अपेडाचे अध्यक्ष डॉ.एम.अंगमुथु म्हणाले की, पारंपरिक वनस्पतीजन्य मांसाच्या निर्यात बाजाराला धक्का न लावता वनस्पतीजन्य मांसयुक्त अन्न पदार्थांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडा विविध प्रकारे प्रयत्न करत आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये, पॅनकेक, स्नॅक्स, चीझ इत्यादी पदार्थांसह इतर विविध वेगन अन्न उत्पादनांच्या ऑस्ट्रेलिया, इस्रायल,न्यूझीलंड आणि इतर अनेक देशांमधील निर्यातील प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने अपेडा नियोजन करीत आहे.
अपेडाने आभासी मेळावे, शेतकरी संपर्क पोर्टल, ई-ऑफिस, हॉर्टीनेट, शोध यंत्रणा, खरेदीदार-विक्रेते मेळावे, रिव्हर्स खरेदीदार-विक्रेते मेळावे, उत्पादन-विशिष्ट जाहिरात मोहिमा इत्यादींचे आयोजन करण्यासाठी आभासी पोर्टलच्या विकासातून अनेक निर्यात प्रोत्साहन विषयक मोहिमा आणि उपक्रम हाती घेतले आहेत. राज्यांमध्ये निर्यातविषयक पायाभूत सुविधा निर्मिती तसेच निर्यातीसाठी स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी अपेडा राज्य सरकारांसोबत सखोल समन्वय साधून काम करीत आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.