लढायचे आहे बेरोजगारीशी.……
शाळा म्हणजे विद्यामंदिर आहे
त्यास अपवित्र कधी करू नको
मादक पदार्थ सेवन करून मित्रा
वाट शाळेची कधी तू धरू नको
हाती असू दे लेखणीस तुझ्या रे
मावा मळत बस स्टँड राखू नको
शिक्षकांच्या खोड्या काढत कधी
अधर्माचे कटू फळे तू चाखू नको
नाकर्तेपणा येईल तुला तू जर का
ध्येयवादी आत्ताच नाही बनशील
वाचनात मन रमविलेच नाही तर
ध्येयास तुझ्या तू कसा गाठशील?
शांत बसून काही फायदाच नाही
तुला लढायचे आहे बेरोजगारीशी
कष्ट करताना तुला लाजायचे नाही
प्रामाणिक रहायचे नित्य मातीशी
कसशील तरच तू इथे रे टिकशील
नाहीतर उपासमार नित्य साहशील
जिंकण्याची तयारी नित्य करताना
शिखरे गाठताना स्वतःस पाहशील
कवी -अजय रमेश चव्हाण,
तरनोळी
ता. दारव्हा, जि. यवतमाळ
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.