‘ मुंबईत उष्णता तर उर्वरित महाराष्ट्रात आल्हाददायक ‘
मुंबईसह कोकणातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आजपासुन ३ दिवस म्हणजे गुरुवार (दि.१६ मे) पर्यंत उष्णतेची लाट तर नव्हे पण उष्णतेच्या लाटसदृश्य स्थिती व दमटयुक्त उष्णता ह्या ५ जिल्ह्यात जाणवेल, असा हवामानाचा अंदाज आहे.
माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
सध्या कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात पुढील ५ दिवस म्हणजे शनिवार (दि.१८ मे) पर्यन्त वादळी वाऱ्यासह विजा व पावसाचे वातावरण तर कोकणातील ७ जिल्ह्यात आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार (दि.१६ मे) पर्यंत ढगाळ वातावरणसहित किरकोळ पावसाची असणारी शक्यता आहे.
मुंबईसह कोकणातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आजपासुन ३ दिवस म्हणजे गुरुवार (दि.१६ मे) पर्यंत उष्णतेची लाट तर नव्हे पण उष्णतेच्या लाटसदृश्य स्थिती व दमटयुक्त उष्णता ह्या ५ जिल्ह्यात जाणवेल, असा हवामानाचा अंदाज आहे.
ह्याउलट मराठवाडा व विदर्भातील १९ जिल्ह्यात व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, दिंडोरी, नांदगाव, येवला व लगतच्या तालुक्यात मात्र अवकाळी सावट जरी असले तरी पहाटेचे किमान व दुपारचे कमाल अशी दोन्हीही तापमाने आजपासुन ३ दिवस म्हणजे गुरुवार (दि.१६ मे )पर्यंत सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने खालावून उष्णतेच्या काहिली विशेष जाणवणार नाही, असे वाटते. कोकण व मध्य महाराष्ट्रातील उर्वरित ११ जिल्ह्यात मात्र दोन्हीही तापमाने सरासरी इतकीच असतील.
मान्सून शनिवार ( दि.१९ मे )दरम्यान बंगालच्या उपसागरात, इंडो्नेशियाच्या पश्चिम किनारपट्टी व सुमात्रा बेटापर्यन्त पोहोचण्याची शक्यता कायम जाणवते. त्यानुसार देशाची पूर्व किनारपट्टी, कन्याकुमारी, व आग्नेय अरबी समुद्रात पूर्वमोसमी गडगडाटी पाऊसपूरक वातावरण तयार होत आहे, असे जाणवते.
माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.