तोंडली…खायला भली
इंग्रजी नाव – Ivy gourd
शास्त्रीय नाव – Coccinia grandis
महाराष्ट्रात तोंडली खूप प्रमाणात खाल्ली जात नाहीत. दक्षिणेत, गुजरात मध्ये खाल्ली जातात. तींडल्याचे लोणचे ही केले जाते. तोंडल्यामध्ये व्हिटॅमिन बी 1 आणि बी 2 विपुल प्रमाणात आहे. मेंदूच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे.
तोंडल्यामध्ये बीटा कॅरोटीन आहे त्यामुळे डोळे चांगले राहतात. व्हिटॅमिन सी आहे, प्रतिकारशक्ती वाढते. तोंडल्याचा ग्लायसेमिक निर्देशांक ( glycemic index ) कमी असल्यामुळे मधुमेहींनी जरूर खावीत. यात भरपूर फायबर आहेत ,तसेच तोंडली चयापचय ( metabolism ) वाढवतात. वजन लवकर कमी येते. तोंडली आहेत आरोग्यासाठी भली..
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक, ताराबाई पार्क
सासने ग्राउंड जवळ,कोल्हापूर
9623895866
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.