- मातोश्री केवळबाई मिरेवाड राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर
- पुरस्कारांमध्ये विलास मोरे, सुभाष किन्होळकर, मनिषा पाटील, सावित्री जगदाळे, डॉ. शंकर विभुते, आनंद कदम, ज्ञानेश्वर शिंदे यांचा समावेश
नांदेड – नायगाव येथील मातोश्री कै. सौ. केवळबाई मिरेवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विलास मोरे, सुभाष किन्होळकर, मनिषा पाटील, सावित्री जगदाळे, डॉ. शंकर विभुते, आनंद कदम, ज्ञानेश्वर शिंदे हे यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत, अशी माहिती संयोजक वीरभद्र मिरेवाड यांनी दिली आहे.
कादंबरी विभागात एरंडोल येथील विलास कांतीलाल मोरे यांच्या ‘पांढरे हत्ती, काळे दात’, कथा या क्षेत्रात बुलढाण्याचे सुभाष किन्होळकर यांची ‘लाल सावट’, आणि मनिषा पाटील यांचा कथासंग्रह ‘नाती वांझ होताना’ या कवितासंग्रहाला देण्यात आला आहे. बालसाहित्य विभागात सातारा येथील सावित्री जगदाळे यांच्या चिंचबन या बालकादंबरीला जाहीर झाला आहे.
डॉ. शंकर विभुते यांची ‘आयास’ कादंबरी, आनंद कदम यांच्या ‘वटभरणाच्या रात्री’ या कथासंग्रहाची निवड करण्यात आली. ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर यांच्या ‘शाळा’ कादंबरीची निवड झाली आहे. डॉ. अशोक कौतिक कोळी, संपादक पांडूरंग पुठ्ठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षण समितीने या पुरस्कारांची निवड केली आहे.
लवकरच एका विशेष समारंभात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण, कवी प्रदीप पाटील इस्लामपूर, साहित्यिक डॉ. अशोक कौतिक कोळी, व्याख्याते देवीदास फलारी, इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशन या शिक्षक संघटनेचे केंद्रीय जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक तथा साहित्यिक वीरभद्र मिरेवाड यांनी दिली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.