September 8, 2024
Medicinal uses of shami tree
Home » शमीच्या झाडाचे औषधी उपयोग
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शमीच्या झाडाचे औषधी उपयोग

शमीच्या (सौंदड) झाडाचे औषधी उपयोग

  • दुर्वांप्रमाणेच शमी शरीरातील कडकीचा नाश करतो. शरीरातील उष्णता घालविण्यासाठी शमीच्या फुलांचा किंवा पाल्याचा रस, जिरे व खडीसाखर एकत्र करून १५ दिवस द्यावे.
  • उष्णतेमुळे त्वचेवरआगपण होते. या विकारावर शमीचा पाला गाईच्या दुधापासून केलेल्या दह्यात वाटून लेप करतात.
  • उन्हाळी लागल्यासही शमीच्या फुलांचे तुरे गाईच्या दुधात वाटून त्यात जिरे व खडीसाखर घालून देतात.
  • नखदंतविषारावर शमी, कडुनिंब व वड यांची साल वाटून लेप करतात.
  • शरीरावर जखमेचे व्रण राहिल्यास शमीच्या झाडाची साल उगाळून लेप लावतात.
  • अतिसारावर शमीच्या झाडाची साल ताकात उगाळून देतात.
  • धुपणीवर शमीच्या कोवळ्या शेंगा व जास्वंदीच्या कळ्या तुपात परतून दुधातून देतात.
  • शमीचा उपयोग विविध औषधांमध्ये केला जातो. अतिसार, मूळव्याध आणि त्वचेच्या विकारावरील औषधे यापासून बनविली जातात.
  • या झाडाचा डिंकदेखील औषधी गुणांनी युक्त आहे. अंगाचा दाह कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
  • शमीच्या कोवळ्या शेंगांची भाजी केली जाते. फोडणीत दही घालावे म्हणजे ही भाजी चवदार होते.
  • शमीच्या झाडावर वाळलेल्या शेंगा कुरकुरीत चवदार लागतात.
  • वास्तुशास्त्रात देखील हे झाड शुभ मानले जाते..त्यामुळे घराच्या मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला लावण्याची प्रथा आहे .

डॉ. मानसी पाटील


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

‘स्व”च्या विकासात जगाचा उद्धार

मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे संत साहित्य पुरस्कार जाहीर

साहित्यकणा संमेलनाच्या अध्यक्षपदी ऐश्वर्य पाटेकर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading