February 11, 2025
Monsoon force will decrease for four days
Home » चार दिवसासाठी मान्सूनचा जोर कमी होणार !
काय चाललयं अवतीभवती

चार दिवसासाठी मान्सूनचा जोर कमी होणार !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ

‘ चार दिवसासाठी मान्सूनचा जोर कमी होणार!’

उद्या रविवार ( दि. २८ ) ते ३१ जुलै पर्यंतच्या चार दिवसात संपूर्ण मराठवाडा तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या १५ जिल्ह्यात जोरदार तीव्रतेच्या पावसाची शक्यता कमी होवून केवळ मध्यमच पावसाची शक्यता ह्या जिल्ह्यात जाणवते.

गुरुवार ( दि.१ ऑगस्ट) पासून मात्र पुन्हा जोरदार पावसाची शक्यता मात्र ह्या जिल्ह्यात जाणवते. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात तर केवळ मध्यम पावसाची शक्यता आठवडाभर म्हणजे शनिवार (दि. ३ ऑगस्ट) पर्यंतही टिकून राहू शकते, असे जाणवते.

छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली ह्या ३ जिल्ह्यात तर सध्या पेरपिके जरी ठिक वाटत असली तरी जोरदार अश्या पावसाची  ह्या जिल्ह्यात अजूनही फार मोठी प्रतिक्षा आहे. ऑगस्ट मधील मान्सूनचे वर्तनच येथील भवितव्य ठरवेल, असे वाटते.

विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

नंदुरबार, धुळे, जळगांव सहित संपूर्ण विदर्भातील अश्या एकूण १४ जिल्ह्यात उद्यापासून आठवडाभर म्हणजे शनिवार (दि. ३ ऑगस्ट) पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मात्र अजूनही कायम आहे.

मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात अतिजोरदार पावसाच्या शक्यतेला अजुन वातावरणीय उतरतीचा धक्का लागलेला नसून अजुन ही शक्यता अजुन किती दिवस आहे हे येणारा काळच ठरवणार आहे.

धरणे ओव्हरफ्लो

मराठवाड्यातील जायकवाडी व इतर लघु-प्रकल्पातील धरणे वगळता ह्या आठवड्यात जलआवकेच्या सातत्यातून महाराष्ट्रातील सर्व धरणात जलसंवर्धनातून जलसाठा वाढीची टक्केवारी शतकाकडे झेपावत आहे,  काही ठिकाणी धरणे तरओसंडून वाहत आहे. आणि जुलैत आतापर्यंत तीन आठवडे ओढ दिलेल्या मान्सूनने जुलै अखेरात महाराष्ट्रासाठी ह्यावर्षी आपल्या वर्तनातून वेगळेच असे हे वैशिष्ठ दाखवून दिले आहे.

धरणे जरी ओसंडत असले तरी, मराठवाड्यातील लघु प्रकल्प व जायकवाडीत समाधानकारक साठा करणाऱ्या, तसेच महाराष्ट्रातील शेतजमिनीची पूर्णपणे भूक शमवणाऱ्या व विहीरींना पाणी-पाझर फोडणाऱ्या जोरदार पावसाची संपूर्ण महाराष्ट्राला अजूनही प्रतिक्षा ही आहेच. कदाचित शेतकऱ्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत ह्यासाठी वाट पहावी लागू शकते, असेच सध्या तरी वाटते. ह्यासाठी ऑगस्ट महिन्यातील मान्सूनचे वर्तन महत्वाचे समजावे.

माणिकराव खुळे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading