आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
प्रश्न – महाराष्ट्रातील मान्सूनचा परतीचा प्रवास कसा आहे ?
माणिकराव खुळे – गेल्या पंधरा दिवसापासून एकाच जाग्यावर खिळलेल्या मान्सूनने आज परतीच्या प्रवासास सुरवात करून महाराष्ट्रापर्यंत मजल मारली. त्याची आजची सीमा रेषा कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर व विदर्भातील अकोला तसेच इतर राज्यातील जबलपूर वाराणसी राक्सऊल शहरातून जात आहे.
दरवर्षी ५ ऑक्टोबरला खान्देशात प्रवेशणारा परतीचा मान्सून, ह्यावर्षी १० ऑक्टोबर ला प्रवेशला असुन येत्या ३-४ दिवसादरम्यान तो महाराष्ट्राबाहेर पडण्याची वातावरणीय शक्यता असुन देशातून त्याच्या सरासरी १५ ऑक्टोबर ला बाहेर पडण्याची शक्यताही जाणवते.
प्रश्न – ह्या वर्षी १५ ऑक्टोबरला जर मान्सून परतला तर मग येणाऱ्या रब्बी हंगामावर त्याचा काय परिणाम जाणवेल ?
माणिकराव खुळे – मान्सून वेळेत परतल्यामुळेच रब्बी हंगामाच्या पुढील सहा महिन्यासाठी निसर्गत : परंपरेने आतापर्यन्त चालत आलेल्या वातावरणीय घटना, म्हणजे थंडी, बंगालच्या उपसागरात अधिक व अरबी समुद्रात कमी अशी होणारे चक्रीवादळे, सरासरी वारंवारेते प्रमाणे हंगामात तयार होणाऱ्या त्या चक्रीवादळांची संख्या, २६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यन्त होणारी पण कमी प्रमाणातील गारपीट, तसेच माफक असे धुक्याचे प्रमाण, थंडीत पडणारे भू-दवीकरण पण कमी प्रमाणात होणारे कमी बादड, प्रमाणातच पडणारे भू-स्फटिकिकरण ( हिवाळ्यात बर्फचा चुरा पडणे), शिवाय वेळेतच पुन्हा ईशान्य मान्सूनचे निर्गमन होणे इत्यादि वातावरणीय घटना पार मार्च – एप्रिल पर्यन्त सुयोग्य असे वातावरणीय बदल शेतीसाठी घडवुन आणतील, असे वाटते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
