आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे, मोबाईल – 94232 17495
मुंबईत पावसाचा जोर कायम ‘
पुणे – आज रविवार ( दि. ८) ते गुरुवार (दि. १२ सप्टेंबर) पर्यंतच्या पाच दिवसात महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर असे सहा जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ह्या सहा जिल्ह्यात केवळ तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
उर्वरित ३० जिल्ह्यापैकी रायगड, मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर,अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली अश्या १५ जिल्ह्यात एखाद्या दुसऱ्या दिवशी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
मान्सूनचा मुख्य आस हा सरासरीच्या दक्षिणेकडे असणार आहे. हीच एक सध्या महाराष्ट्रातील पावसासाठी जमेची बाजू समजावी.
माणिकराव खुळे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.