कांदा बी सुकवणे व साठवण
- मळणी केलेल्या कांदा बियाण्यात १० ते १२ टक्के आर्द्रता असते म्हणून स्वच्छ केल्यानंतर बी पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे.
- साठवणीसाठी बियांमध्ये सामान्यतः ६ ते ७ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता नसावी. अशा बियांचे आयुष्य एक ते दीड वर्ष असते. बियांत पाण्याचा अंश ६ ते ७ टक्के पेक्षा जास्त राहिला तर बियांची उगवण क्षमता कमी होते.
- बी जास्त दिवस साठवण्यासाठी आर्द्रता रोधक पिशव्यांचा वापर करावा. पिशवीत बी ठेवण्याआधी बियांमध्ये ६ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता नसावी.
- सर्वसाधारणपणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये बी वाळवून भरले तर बी जास्त काळ टिकू शकते.
- बियांच्या पॅकिंग साठी हवाबंद टिनाच्या डब्यांचा पण वापर केला जातो.
- पॅकिंग केलेल्या बियांण्याच्या पाकिटावर अथवा पिशवीवर जातीचे नाव, बियांचे प्रकार, पॅकिंगची तारीख, उगवण क्षमता इत्यादी सर्व बाबींची नोंद करावी.
सौजन्य – कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.