पंढरीची वारी
अष्टाक्षरी काव्यलेखन
ओढ घेते मन किती
करे पंढरीची वारी
आस लागे जीवा तुझी
कधी भेटेल श्रीहरी….१
प्रपंचाचा गाडा मागे
कसा येऊ पंढरीला
जीव होई कासावीस
डोळे तुझ्याच वाटेला….२
मुखी नाम विठोबाचे
सुरूवात ती जोशात
दिंडी सोहळा पहातो
मीच माझ्या अंतरात….३
आई वडील मानतो
माझे विठ्ठल रुक्मिणी
पायावरी माथा ठेवी
घेतो धन्यता मानूनी….४
भेटे मजला संसारी
देव भक्तीचा भुकेला
नाही आता उणे मज
ह्रदयात तो दिसला……५
सीमा मंगरूळे तवटे, वडूज, सातारा
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.