April 27, 2025
Pasaydan Literary Awards 2024 Announced by Guhagar-Based Foundation
Home » गुहागरच्या पसायदान प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

गुहागरच्या पसायदान प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

रत्नागिरी – गुहागर येथील पसायदान प्रतिष्ठान २०१४ पासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. प्रतिवर्षी तीन साहित्यिकांना उत्कृष्ट कलाकृतीसाठी सन्मानित करण्यात येते. यंदा २०२४ मध्ये प्रकाशित कलाकृतींना सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रभरातून कादंबरी, कविता, ललित या वाड्मय प्रकारांमध्ये असंख्य कलाकृती प्राप्त झाल्या. त्यामधून तज्ञ परीक्षकांनी निवडलेल्या कलाकृतींना पसायदान प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात येणार आले आहेत.

पुरस्कारप्राप्त कलाकृती अशा –

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार ठाणे येथील रामदास खरे यांच्या “द लॉस्ट बॅलन्स” या कादंबरीस देण्यात आला आहे. तीन हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

कविता विभागातील पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्कार पुणे येथील सुनीता डागा यांच्या “तुझे शहर हजारो मैलावर” या पुस्तकास जाहीर झाला असून ३०००₹ रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

विंदा करंदीकर ललित वाड्मय पुरस्कार पुसद येथील निशा डांगे यांच्या “कपाळ गोंदण” यांच्या पुस्तकास देण्यात आला आहे. ३००० ₹ रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना कोल्हापूर येथे ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये हिंदीतील ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक गोपाल (सहर) शर्मा यांच्या हस्ते शाहू स्मारक मंदिर येथे १२ मे रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!