कोल्हापूर – : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्यांतर्गत रब्बी हंगाम 2024 मध्ये पीक स्पर्धा योजना घेण्यात आली होती. यामध्ये एकूण 83 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्या शेतकऱ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात येतो.
रब्बी 2024 मधील पीकस्पर्धा योजनेचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय निकाल असा –
रब्बी ज्वारी – राज्यस्तर -व्दितीय – राजेंद्र देऊ बन्ने, मु.पो.तारदाळ, ता. हातकणंगले,
जिल्हास्तर- प्रथम केरबा हरी माने, मु.पो.कौलगे, ता. कागल, व्दितीय-संजय केशव पाटील, मु.पो.मौजे तासगांव, ता.हातकणंगले, तृतीय- आप्पासो संभाजी भोसले, मु.पो.केर्ले, ता. करवीर
हरभरा – जिल्हास्तर- प्रथम -निलेश बाबासो उमाजे-मु.पो.अकिवाट, ता. शिरोळ, व्दितीय- जगदीश विलास पाटील, मु.पो.राजापुर, ता. शिरोळ, तृतीय- प्रकाश गणपती कोरे, मु.पो.अब्दुललाट, ता.शिरोळ
गहू – प्रथम- अविनाश विलास मगदूम, मु.पो.घुणकी, ता.हातकणंगले, व्दितीय- सुरेश बाबासो बरगाले, मु.पो.सांगवडे, ता. करवीर, तृतीय- शर्मिला शिवाजी पाटील, मु.पो.भुयेवाडी, ता.करवीर
करडई- जिल्हास्तर-प्रथम- विजय बाबुराव चौगेल, मु.पो.अर्जुनवाड, ता.शिरोळ
तालुकास्तर पुरस्कारासाठी प्रथम क्रमांक 5 हजार, द्वितीय 3 हजार व तृतिय क्रमांक 2 हजार रुपये असे तर, जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक 10 हजार, द्वितीय 7 हजार व तृतीय 5 हजार रुपये तर राज्य पातळी- पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार व तिसरे 30 हजार याप्रमाणे बक्षीस देण्यात येते.
रब्बी 2025 मध्ये होणाऱ्या पीकस्पर्धा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
