कोल्हापूरचा हा मराठी कलाकार हिंदीमध्ये आपले करिअर करण्यासाठी धडपडतो आहे. युवा कलाकार असणाऱ्या जितेंद्र पोळ यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मुंबईत जाऊन स्वतः काम मिळवणे इतके सोपे राहीलेले नाही. अशावेळी स्वतःच्या हिमतीवर अन् तेही कोरोना कालावधीमध्ये तो हिंदीमध्ये उतरतो आहे. ही खरोखरच कोल्हापूरकरांसाठी प्रशंसनीय गोष्ट आहे.
https://www.instagram.com/jeet_nandatai_pol/
जितेंद्र पोळ
मी तुझा रंकाळा, तु माझी पंचगंगा म्हणत कोल्हापूरची प्रबोधनांची परंपरा जपणारा. ‘स्वराजरक्षक संभाजी’ आणि ‘जुळता जुळता जुळतयं की’ या मालिकेतून घराघरांत पोचलेला मराठी युवा कलाकार जितेंद्र पोळ सध्या हिंदीकडे वळतो आहे. क्रिमिनल्स, घाटगे आणि सुन, सावित्री ज्योती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासह विविध टीव्ही मालिकामध्ये स्वतःचे नाव कमावलेला कोल्हापूरचा जितेंद्र आता हिंदी मालिकामध्ये दिसणार आहे. मेहंदी है रचनेवाली या हिंदी मालिकेत तो दिसणार आहे.
कोल्हापूरचा हा मराठी कलाकार हिंदीमध्ये आपले करिअर करण्यासाठी धडपडतो आहे. युवा कलाकार असणाऱ्या जितेंद्र पोळ यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मुंबईत जाऊन स्वतः काम मिळवणे इतके सोपे राहीलेले नाही. अशावेळी स्वतःच्या हिमतीवर अन् तेही कोरोना कालावधीमध्ये तो हिंदीमध्ये उतरतो आहे. ही खरोखरच कोल्हापूरकरांसाठी प्रशंसनीय गोष्ट आहे.
क्रिमिनल्स या सोनी मराठीवरील मालिकेत ते काम करत होते. यातूनच त्यांना हिंदीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
याबद्दल बोलताना जितेंद्र पोळ म्हणाले, हिंदी मालिकांचा आवाका मोठा आहे. साहजिकच आर्थिक गणितही त्या तुलनेत असते. यामुळे हिंदीमध्ये काम करण्याचे आकर्षण हे प्रत्येक कलाकरामध्ये असते. ती संधी मला चालुन आली आहे. यासाठी मी त्यांची ऑडिशन्सही दिली. त्यामुळे माझी सुरु असलेली धडपड कोठेतरी यशस्वी होताना दिसत आहे. हिंदीमध्ये मला काम मिळते आहे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
मेहंदी है रचनेवालीमध्ये सहकलाकार म्हणून काम करत असलो तरी ते काम पूर्णवेळ आहे. आत्तापर्यंत कोल्हापुरातील अनेक कलाकारांनी हिंदीमध्ये काम केले आहे, पण ते एक दोन दिवसांचे किंवा थोड्या कालावधीपूरते मर्यादीत होते. पण मला मिळालेली संधी ही पूर्णवेळ आहे. ती मालिका संपेपर्यंत माझे काम राहाणार आहे, असेही श्री पोळ यांनी सांगितले.
पहिल्या दिवशीच्या चित्रिकरणाबाबतचा अनुभव सांगताना श्री पोळ म्हणाले, हिंदीमध्ये काम करताना मला थोडी भिती निश्चितच होती. कारण आपले उच्चार निट येणे आवश्यक असते. कोल्हापूरचा असल्याने आपली ग्रामीण बोली भाषा माझ्या तोंडात असते. हिंदी नीट येणे हे माझ्यासाठी आव्हानच होते. पण याबाबत मी प्रथम दिग्दर्शकांशी बोललो होतो. तेव्हा त्यांनी धीर देत बिनधास्थ राहा असे सांगितले. तुम्हाला जसे येते तसे बोला यात काही अडचण नाही. यामुळे मला दिलासा मिळाला. सर्वजण सहकार्य करणारे असल्याचे हळूहळू माझी हिंदी निश्चितच सुधारेल. अशी आशा आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.