बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठात ३ फेब्रुवारीला शिल्पकला कार्यशाळा
कोल्हापूर: शिल्पमहर्षी शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठात येत्या सोमवारी (दि. ३ फेब्रुवारी) शिल्पकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग आणि शिल्पसम्राट कला स्टुडिओ यांच्यावतीने स्व. शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या कलेच्या स्मृती सर्वांपर्यंत पोहोचाव्यात आणि नवशिल्पकार व कलाकारांना प्रेरणा मिळावी, या हेतूने ‘शिल्पकला कार्यशाळा-२०२५’ आयोजित केली आहे. कार्यशाळेत बी.आर. खेडकर यांच्या कन्या शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के आणि शिल्पकार संजीव संकपाळ हे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत.
३ फेब्रुवारीला सकाळी १० ते ४ या वेळेत विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रासमोरील उद्यानात कार्यशाळा होईल. कार्यशाळेतील उत्तम कलाकृतींना सन्मानचिन्हे आणि अनुक्रमे रु. २०००, रु. १००० आणि रु. ५०० रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुकांनी १ फेब्रुवारीपर्यंत १०० रुपये शुल्कासह नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ९०४९६४४४२३ आणि ९४२२४१६१७५ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.