शेपू पालेभाजी इंग्रजी नाव Dill
शास्त्रीय नाव Anethum graveolens
गौरीच्या नैवेद्यात जी मिक्स भाजी केली जाते त्यामध्ये प्रामुख्याने शेपूची भाजी असते. शेपूची भाजी अतिशय औषधी गुणांची आहे.
शेपूमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. शेपू मध्ये कॅल्शियम चे प्रमाणही भरपूर आहे. हाडे बळकट होण्यास मदत होते.
शेपू मुळे शरीरातील कॉर्टिसोल या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची निर्मिती कमी प्रमाणात होते. त्यामुळे झोप चांगली लागते.
शेपू मध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट आहेत शेपू रक्तातील साखर नियंत्रित करते तसेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास शेपूची भाजी मदत करते.
पचनशक्ती वाढवण्यासाठी, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी शेपूची भाजी एकदम गुणकारी आहे.
काही जणांना शेपूचा वास आवडत नाही. त्यांनी शेपूचा चहा करून घेण्यास हरकत नाही. शेपू मुळे तुमचे चयापचय ( metabolism ) वाढते, वजन कमी होण्यास मदत होते.
ग्रीक लोकांमध्ये शेपूचे झाड दारात असणे हे ऐश्वर्याचे लक्षण मानतात. शेपू आहेच तसा गुणकारी .
शेपू भाजीचे फायदे…
- पोटाचे विकार करते दूर खूप जणांना पोटाचे विकार असतात. …
- वजन नियंत्रणात ठेवण्यास करते मदत …
- निद्रानाशाचा त्रास करते कमी …
- हार्मोन्सचे संतुलन राखण्यास करते मदत …
- मासिक पाळीतील त्रास करते कमी …
- हाडांना आणते बळकटी …
- मधुमेहींसाठी चांगली …
- पचनशक्ती करते चांगली
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक , ताराबाई पार्क,
सासने ग्राउंड जवळ,कोल्हापूर
9623895866
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.