यादवाड येथे आहे शिवाजी महाराज यांचे मंदिर
- मल्लाबाई देसाई यांनी कर्नाटकातील यादवाड येथे उभारले आहे शिवाजी महाराज यांचे मंदिर.
- बेळगाव धारवाड मार्गावर आयआयटी संस्थेच्या पुढे असणाऱ्या नरेंद्र फाट्यावरून साडे बारा किलोमीटरवर यादवाड हे गाव वसले आहे.
- यादवाड येथील हनुमान मंदिराच्या डाव्या बाजूला छोट्या मंदिरात शिवाजी महाराज यांचे हे शिल्प आहे.
- मल्लाबाई हिने हे शिल्प शिवाजी महाराज यांच्या दिलादारपणाची साक्ष म्हणून तयार केले आहे.
- सुमारे चार फुट उंचीचे हे शिल्प दोन भागात विभागले आहे
- पहिला वरच्या भागात कोरीव खांब, पोपट आणि लतावेलींची सुंदर महिरप कोरली आहे. यातच शिवाजी महाराज यांचेअश्वारुढ शिल्प आहे
- खालच्या भागात महाराज आसनावर बसलेले आहेत. त्यांच्या मांडीवर एक मुल आहे. समोर मल्लाबाई वाटी घेऊन उभ्या आहेत. या प्रसंगात एक सैनिक पाण्याची सुरई घेऊन समोरील बाजूस उभा आहे. महाराजांच्या मागे एक धनुर्धारी स्त्री सैनिक उभा आहे यावरून मल्लाबाईच्या सैन्यदलात स्त्री सैनिक असावेत असे स्पष्ट होते.
- फटाक्यांची दहशत…
- आंतर विद्याशाखीय परिषदेत होणार मराठा किल्ल्यांचे संशोधन
- उदय काकांच्या शद्बांचं भिरभिरलेपण…
- ब्युटी ऑफ लाईफ सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत
- महाराष्ट्रात पाच नोव्हेंबरपासून निवळणार पावसाळी वातावरण
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.





