गोफणगुंडा
सत्तेच्या कुंपणात
दाढीवाले बंद झाले,
सत्ता सुंदरीच्या नादाने
सत्ता पिऊन धुंद झाले
आपआपल्या सोईने
जोडुन घेतली नाती,
ना चळवळ ना संघर्ष
आंदोलनाची झाली माती…
पुन्हा नवी चळवळ
नवा नवा संघर्ष होईल,
आंदोलनाच्या झोळीतुनच
नवा नेता जन्मा येईल
कंबरेखाली शेपुट फुटता
सत्तेपुढे गोंडा घोळेळ,
लालादिव्याच्या स्वप्नासाठी
बुटावरती लोळेल
पुन्हा त्यांच्या डोक्यावरती
सत्तेचा ताज दिसेल,
चळवळीच्या म्हशीला
पुन्हा सघंर्षाचा माज असेल
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.