आळशी बनवण्याचा धंदा
आता कशाला काम कशाला धंदा
सरकार, घरी बसून देतंय रुपाया बंदा
सरकार झाले स्वार्थी
एसटी झाली अर्धी,
बाप्यापरिस बायांची
तुफान झाली गर्दी
ज्याची शेती त्यानीच करावी
खुरपणी, काढणी, मळणी
टावेल बांधून डोक्याला
नांगरणी पेरणी कोळपणी
लाडकी बहिण लाडका भाऊ गोळा करी चंदा
आता कशाला काम कशाला धंदा
सरकार, घरी बसून देतंय रुपाया बंदा
शेतकरी सन्मान स्किम
शेतमालाचा काढते काटा
खा प्या आराम झोपा
मुग गिळून सोसा तोटा.’
देश महासत्तेकडे निघाला
मोफत रेशन वाटून
सरकारी प्रेमाने खरेच
डोळे आले दाटून
देणारा दाता राजा हरिश्चंद्रचा बंदा
आता कशाला काम कशाला धंदा
सरकार, घरी बसून देतंय रुपाया बंदा
आधीची फाटकी तिजोरी
अजून थोडी फाडली
कर्जाची पुरवणी यादी
मतदान पाहुन जोडली
काय टिकेल काय हटेल
सगळे डाॅलरच्या माथी
बेरोजगारी बढाव की हटाव
कंच्या पुढार्याच्या हाती
देश आळशी बनवण्याचा, खेळ आहे गंदा
आता कशाला काम कशाला धंदा
सरकार, घरी बसून देतंय रुपाया बंदा
शिवाजी सातपुते ९०७५७०२७८९
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
