April 6, 2025
Social media sharing features with Jetpack plugging AI
Home » जेटपॅक प्लगिंगच्या एआयसह सोशल मिडिया शेअरींगच्या सुविधा
संशोधन आणि तंत्रज्ञान

जेटपॅक प्लगिंगच्या एआयसह सोशल मिडिया शेअरींगच्या सुविधा

सध्या एआय तंत्रज्ञानामुळे अनेक कामे सहज अन् झटपट होऊ लागली आहेत. कामाचा व्याप कमी करण्यात हे तंत्रज्ञान खुपच उपयुक्त ठरत आहे. यात कंटाळवानी वाटणारी कामेतर आपोआपच केली जाऊ लागली आहेत अर्थात अॅटो. म्हणजे ते काम या तंत्रज्ञानाने त्यांनी संपवूनच टाकले आहे असे म्हटले तर चुक होणार नाही. तुमचा कामाचा व्यापच कमी करून टाकला आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे,

वेबसाईटचे सोशल मिडियावर शेअरिंग हे खुपच कंटाळवाने काम आहे. बातम्यांच्या वेबसाईटवर तर मिनिटा मिनिटाला न्युजलिंक तयार होत असतात. त्या सर्वच्या सर्व सर्वत्र शेअर्स करणे हा तर बिनकामाचा धंदाच आहे. शेअरिंग केले नाही तर वेबसाईटला व्हिजिटर्स येत नाहीत अन् आपले उद्दिष्ट साध्य होत नाही. पण आता हे काम अगदीच सुलभ झाले आहे. साईटवरील पोस्टची लिंक सोशल मिडियाच्या विविध साधनांवर शेअर करण्याचे काम कोणत्याही श्रमविना करण्याची सुविधा जेटपॅकच्या प्लगिंगने उपलब्ध करून दिली आहे. न्युजलेटर्सच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या प्रत्येक बातमीची लिंक तयार झाल्या झाल्या चाहत्यांना ईमेल द्वारे पाठविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी सस्क्राबर्स वाढविण्यासाठीचे माध्यमही जेटपॅकने युजर्स फ्रेंड्ली बनविले आहे.

न्युजलेटर्स पाठविण्याची सविधा सर्वांकडेच असते पण लिंक प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच फेसबुक, इन्ट्रा, Linkedin, थ्रेड आदी सोशल मिडियावर जाण्याची सुविधा सहसा उपलब्ध नाही. ही सुविधा जेटपॅक प्लगिंगने वर्डप्रेसच्या वेबसाईटसाठी अगदी मोफत दिली आहे. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ती अॅटोमेटिक फेसबुक, इन्ट्रा, थ्रेड, लिंक्ड्इन आदी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर जाते. यामुळे वाचक मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शेअरिंगसाठीचा कालावधी सहजच वाचतो. या सुविधामुळे साईटचा परफॉर्मन्स स्कोअरही सुधारतो.

काय आहे एआय असिस्टंट ?

वर्डप्रेसच्या वेबसाईटमध्ये जेटपॅकचा एआय असिस्टंट अनेक कामे सोपी करून देतो. आपण काम करत असताना अनेक चुका होत असतात. काही गोष्टी नकळत राहून जात असतात. त्या होणाऱ्या चुका कमी करण्याच्या कामात हा एआय असिस्टंट खुपच उपयोगी ठरतो. सध्या सर्वकाही झटपट हवे असते. जितके काम सोपे होईल तितके आपणास हवे असते. जेटपॅकचा हा एआय असिस्टंट मराठी भाषाही उत्तम प्रकारे जाणतो.

बातम्यांचे संपादन किंवा लेखांचे संपादन हे सर्वात जिकिरिचे काम. बातम्या आणि लेखामध्ये छोटी छोटी वाक्ये हवी असतात. पण जेटपॅकचा एआय असिस्टंट या बातम्यांचे व लेखांचे संपादनही करतो. मोठी मोठी वाक्ये लहान अन् सोप्या भाषेत करण्याचे काम करतो. विशेष म्हणजे मराठीत संपादन अन् छोटी छोटी वाक्ये करण्याचे तंत्रज्ञान उत्तम प्रकारे करतो. यामध्ये हा माहीर असल्याने भविष्यात संपादनाच्या कामात हा उपयुक्त ठरणारा आहे. वेळेची बचत अन् अचुकता या प्लगिंगने साधली जात असल्याने हे निश्चितच उपयुक्त असे साधन वेबसाईटधारकांसाठी आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading