गारगोटी – येथील अक्षरसागर साहित्य मंचचे 2024 सालचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार 2024 ज्येष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर तथा एन. डी. पाटील (कोनवडे) यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंचाचे अध्यक्ष डॉ. मा. ग. गुरव यांनी दिली.
जाहीर करण्यात आलेले राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार असे –
कादंबरी –
1) अरुण नवले (सोलापूर) – जागलं
2) डॉ. मीना सुर्वे (सांगली) – ठिगळ
कथासंग्रह
1) डॉ. राज यावलीकर (अमरावती) – गाव विकणे आहे
2) इंद्रजीत पाटील (सोलापूर) – शेलक्या बारा
3) प्रा. अरविंद मानकर (सरवडे) – घुंगरू
कवितासंग्रह
1) धनाजी घोरपडे (सांगली) – जामिनावर सुटलेला काळा घोडा
2) सुनील उबाळे (छ. संभाजीनगर) – उलट्या कडीचं घर
3) सीमा झुंझारराव (मुंबई) – खुल्या मनाच्या खिडक्या
4) डॉ. स्नेहल कुलकर्णी (गारगोटी) – दिशांतर
5) नंदा लाड (पिराचीवाडी) – काव्यनंदा
6) दिपाली सुनील पाटील (मडिलगे) – शब्दांना गवसले सूर
बालसाहित्य
1) विजय जोशी (डोंबिवली पू.) – टोपीवाले फुगे (बालकविता)
2) रविंद्र जवादे (अकोला) – चिंटू आणि त्याचे घर (कथासंग्रह)
3) उर्मिला तेली (भोगावती) – महात्मा गांधी चरित्र
संकिर्ण
1) गंगा गवळी पवार (नाशिक) – धुनीवरल्या गोठी
2) भारत सातपुते (लातूर) – जागरण
3) वर्षा किडे कुळकर्णी (नागपूर) – जाणिव नेणीव
4) सुनील देसाई (मिणचे) – स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया (आत्मचरित्र)
5) सचिन ऐनापूरे (गारगोटी) – मशिनिस्ट थेअरी
लवकरच या सर्व पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
