‘घाटमाथ्यावरील सक्रियेनंतर शेवटी मान्सून घाट उतरला !’
शनिवार पासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार!’
१-गेल्या आठवड्यात(१७ ते २४जुलै) दरम्यान घाटमाथ्यावर हजेरी लावून मान्सून घाट उतरत, मराठवाड्यासहित खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या (८+१०)१८ जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.
२-मराठवाडा वगळता महाराष्ट्रात आजपासुन शनिवार दि. ३ ऑगस्ट पर्यंतच्या १० दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
३-मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात मात्र अतिजोरदार पावसाचीही शक्यता अजुनही कायम टिकूनच आहे.
४-परवा शनिवार दि.२७ जुलै पासून मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यात पुढील ६ दिवस म्हणजे १ ऑगस्ट पर्यन्त पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता जाणवते.
५-घाटमाथ्यावरील दमदार पावसाने सह्याद्रीच्या कुशीतील तसेच विदर्भातील धरणात जलसंवर्धन होत असुन, जलसाठा वाढीचे सातत्य टिकून आहे. जुलै अखेर ही धरणे १०० टक्क्याच्या आसपास भरण्याची शक्यता जाणवते. मराठवाड्यातील जायकवाडी व इतर लघु-प्रकल्पातील धरणांसाठी मात्र अजुन काही काळ चांगलीच प्रतिक्षा करावी लागेल, असेच वाटते.
माणिकराव खुळे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.