आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ
माणिकराव खुळे
मोबाईल – 9423217495
१- मराठवाडा:-
मराठवाड्यात धूळ वा पुरेस्या ओलीवरील पेर पिकांना जून शेवट आठवड्यातील, किरकोळ ते मध्यम पावसाने काहीसा दिलासा वाटत असला तरी, अजुन शेतकऱ्यांमध्ये तेथे चांगल्या पावसाची प्रतिक्षा ही कायम आहे.
पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. ४ जुलै पर्यन्त पावसाच्या सध्य:स्थितीत विशेष काही बदल जाणवत नसुन, मराठवाड्यात अजूनही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचीच शक्यता जाणवते.
२- उत्तर व मध्य महाराष्ट्र:-
खान्देशपासून सोलापूरपर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात, जून शेवटच्या आठवड्यात, भाग बदलत मध्यम पावसाने हजेरी लावली. परंतु खरीप पेर हंगाम स्थिती येथेही समाधानकारक नसून जोरदार पावसाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. ४ जुलै पर्यन्त येथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
खान्देश ३ जिल्हे व पेठ इगतपुरी त्र्यंबकेश्वर सुरगाणा कळवण सटाणा मालेगाव देवळा तालुक्यात मात्र काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
३- कोकण व विदर्भ :-
जून शेवटच्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात जोरदार तर विदर्भात पूर्वानुमनानुसार मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. विदर्भातील पेर पिकांना जीवदान तर नापेर क्षेत्रात पेरीसाठी ह्या पावसाने मदत होवु शकते, असे वाटते.
पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. ४ जुलै पर्यन्त पावसाची स्थिती अशीच म्हणजे कोकणात अति-जोरदार तर विदर्भात जोरदार पावसाची शक्यता कायम जाणवते. विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली व चंद्रपूर मध्ये अति जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
माणिकराव खुळे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.