ट्रायकोडर्मा ही जमिनीत आढळणाऱ्या अनेक उपयुक्त बुरशींपैकी एक नैसर्गिक बुरशी आहे. याच्या विरिडी, हर्जानियम अशा अनेक प्रजाती आहेत. या बुरशीचे वैशिष्ट्ये म्हणजे जमिनीत ही बुरशी अत्यंत वेगाने वाढते आणि दुसऱ्या कोणत्याही रोगकारक (फायटोफ्थोरा, फ्युजारियम, पिथियम, rizoctonia इत्यादी) बुरशीना वाढू देत नाही. या तंत्र प्रणालीचे कारणे अशी.
१) इतर बुरशीच्या तुलनेत जलद वाढ होते
२) ही बुरशी वाढत असताना काही संप्रेरके तयार होता असतात, त्यामुळे हानिकारक बुरशीचा नायनाट होतो.
३) यातील काही संप्रेरके पीक वाढीला पोषक म्हणून मदत करतात (याला बायोप्रायमिंग असे म्हणतात).
४) ही बुरशी सेंद्रिय पदार्थ म्हणजे शेणखत, पाला पाचोळा यावर वाढते.
Tricoderma कोणत्या स्वरूपात उपलब्ध होतो?
द्रवरूप आणि भुकटी दोन्ही स्वरूपात उपलब्ध असतो.
कोणत्या पिकांना व रोगांवर काम करतो?
चिकू, आंबा, नारळ, डाळींब, द्राक्ष, लिंबूवर्गीय सर्वच फळपिके, इतर भागात होणारी सर्व फळे व यांना होणारा रोग जसे मूळकुज, फळकुज, फळे काळी पडणे. सर्व प्रकारचा भाजीपाला उदा. मिरची, वांगी, वेलवर्गीय भाज्या यांना होणारा मूळकूज, शेंडामर रोग इत्यादी तसेच मोगरा, सोनचाफा, जाई, झेंडू इत्यादी फुलपिके.
कसा वापर करावा ?
१) फळपिकांना वर्षातून एक किंवा दोन वेळा जमिनीतून द्यावा. प्रमाण एक एकर साठी २ लिटर
२) भाजीपाला व एक वर्षीय फुलपिकांना रोपे लागवड करताना मुळे बुडवून किंवा लागवड झाल्यावर पाण्यासोबत आळवणी करून द्यावे. एक महिन्याच्या अंतराने दोन वेळा द्यावे. मर रोग येत नाही.
३) पोलीहाऊस मधील सर्व पिके
प्रमाण: एक एकर साठी 2 लिटर
आळवणी करताना 10 लिटर पाण्यात 100 मिली
वापर कसा करावा
1) फळबागेला देताना एक एकर साठी २०० किलो कंपोस्ट खत घ्यावे, त्यात २ लिटर tricoderma व थोडे पाणी टाका. आठ दिवस सावलीत राहू द्या. यावेळी या बुरशी ची वाढ होते. नंतर Tricoderma मिश्रित कंपोस्ट खत सर्व जमिनीवर टाकून द्या.
2) भाजीपाला लागवड झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसात एकरी २ लिटर Tricoderma २०० लिटर पाण्यात टाकून प्रत्येक रोपाच्या मुळाजवळ हे द्रावण ५० ते १०० मिली द्यावे.
किंवा drip system ने द्यावे.
केव्हा द्यावे ?
पावसाळ्याच्या सुरुवातीला द्या, जेव्हा जमिनीत ओलावा आहे. उन्हात जमीन तापली असते तेव्हा देऊ नये. Trichoderma हे रोग येण्याआधीच वापरावे. रोग आल्यानंतर रासायनिक बुरशी नाशकाचा वापर करावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.