गडहिंग्लज – येथील कवी विलास माळी यांच्या पत्नी कै .योगिता माळी यांचे स्मृतीप्रित्यर्थ येथील ‘अनुबंध ‘ प्रतिष्ठानतर्फे काव्यसंग्रह पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेच्या सचिव क्षितिजा माळी – कुलकर्णी यांनी दिली आहे.
प्रतिष्ठानतर्फे काव्यसंग्रहास देण्यात येणारे २०२४ चे पुरस्कार असे –
प्रथम पुरस्कार – घामाचे संदर्भ – किरण भावसार, सिन्नर जि. नाशिक.
व्दितीय पुरस्कार – पातीवरच्या बाया – सचिन शिंदे, मु. मुरली, ता. उमरखेड, जि. यवतमाळ.
तृतीय पुरस्कार – व्यक्त होतोय मी – विलास गावडे, नवीन पनवेल, नवी मुंबई.
विशेष काव्यसंग्रह पुरस्कार असे :
० जामिनावर सुटलेला काळा घोडा – धनाजी घोरपडे, बहादुरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली
० दिवस कातर होत जाताना – धर्मवीर पाटील, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.
० तिथे भेटूया मित्रा – संकेत म्हात्रे, ठाणे
प्रथम पुरस्कार रोख ५००० रुपये, व्दितीय ३००० रुपये तर तृतीय पुरस्कार २००० रुपये असे असून विशेष तीन पुरस्कार प्रत्येकी १००० रुपये तसेच आकर्षक स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या योजनेसाठी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. निलेश शेळके व प्रा. डॉ. विनोद कांबळे यांनी काम पाहिले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
