दमसा सभेच्या अध्यक्षपदी भीमराव धुळुबुळू यांची निवड
कार्याध्यक्षपदी दि. बा. पाटील, कार्यवाहपदी विनोद कांबळे, संपादकपदी हिमांशू स्मार्त
कोल्हापूरः दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या अध्यक्षपदी प्रा. भीमराव धुळुबुळू तर कार्याध्यक्षपदी दि. बा. पाटील यांची निवड एकमताने करण्यात आली. कार्यवाहपदी डॉ. विनोद कांबळे, तर दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादकपदी हिमांशू स्मार्त यांची निवड करण्यात आली.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या कार्यकारिणीची बैठक विजय चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिवपदी निवड झाल्यामुळे नव्या जबाबदारीला न्याय देता यावा यासाठी `दमसा`च्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती चोरमारे यांनी केली, त्यानुसार कार्यकारिणीने नव्या निवडी केल्या. उपाध्यक्ष भीमराव धुळुबुळू यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष प्रा. वि. द. कदम यांनीही नव्या पिढीकडे जबाबदारी देण्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतला, त्यांच्याजागी कादंबरीकार दि. बा. पाटील यांची निवड करण्यात आली.
नवी कार्यकारिणी अशीः अध्यक्ष – प्रा. भीमराव धुळुबुळू, कार्याध्यक्ष – दि. बा. पाटील, उपाध्यक्ष – गौरी भोगले, कार्यवाह – डॉ. विनोद कांबळे, खजिनदार – श्याम कुरळे, सदस्य – डॉ. विजय चोरमारे, पाटलोबा पाटील, विलास माळी, नामदेव भोसले, डॉ. चंद्रकांत पोतदार आणि विक्रम राजवर्धन.
सल्लागार मंडळ – प्रा. चंद्रकुमार नलगे, प्राचार्य विश्वास सायनाकर, प्रा. वि. द. कदम, पी. सी. पाटील, डॉ. सौ. प्रमिला जरग, नामदेव माळी आणि डॉ. दीपक स्वामी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.