ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये पळस या वनस्पतीबद्दल माहिती…
– सतिश कानवडे
संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804
वनस्पतीचे नाव- पळस
वनस्पतीचे वर्णन–
फाबेसी या कुळातील वृक्ष. हा प्रामुख्याने ओसाड जमीन, माळरान किंवा कुठल्याही प्रकारचे पिक येणार नाही अशा ठिकाणी येते. ८ ते १० मीटर उंच वाढतो. हा छोटा वाकडा तिकडा वाढणारा पानझडी वृक्ष आहे.
औषधी उपयोगी–
पळसाच्या पाना-फुलांत ग्लुकोसाइडस आढळतात. फुलांमध्ये ट्युत्रिन द्रव्ये आढळतात. सालीत किनो टेनीन व गेलिक अएसीद असते. पळस व आवळ्याचा रस वाळवून सेवन केल्यास बुद्धीची वाढ होते. पळस एक औषधी वनस्पती आहे. विविध रोगावर त्याचा उपयोग होतो. तिच्या पानापासून पत्रावळी बनवतात. मुळापासून धागे बनवतात. फुलांपासून रंग बवतात. बियांपासून औषधी तेल बनवतात. तो एक पवित्र वृक्ष मानतात. फुलांचा काढा लघवी साफ होण्यासाठी करतात.
हवामान व जमीन–
पाण्याचा निचरा होणाऱ्या आणि कोरड्या हवामानात चांगली वाढ होते.
लागवड–
बियांपासून रोपे तयार करावी. लागवडीसाठी ३ बाय ३ मीटर अंतरावर ३० बाय ३० बाय ३० सेंटीमीटर खड्डा खोदून त्यामध्ये ३० ते ५० सेंटीमीटर वाढ झालेल्या रोपांची लागवड करावी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.