राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशक यांचेकडून पुस्तके मागवणेत येत आहेत. कादंबरी, कथासंग्रह व बालसाहित्य या तीन साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती गारगोटी येथील लेखक बा. स. जठार यांनी दिली आहे.
देण्यात येणारे पुरस्कार असे –
राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार –
सदाशिव धों. जठार यांचे स्मरणार्थ कादंबरीसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे तर आकुबाई स. जठार यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे. या व्यतिरिक्त कादंबरीसाठी दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.
राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार –
यशवंत आ. इंदुलकर यांचे स्मरणार्थ उत्कृष्ठ कथासंग्रहासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे तर सरस्वती य. इंदुलकर यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे. या व्यतिरिक्त कथासंग्रहासाठी दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार –
दत्तात्रय स. जठार यांचे स्मरणार्थ उत्कृष्ठ बालसाहित्यासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह तर तातोबा द. पोवार यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह तसेच आकुबाई स. जठार यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे.
लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व लेखकाचा अल्पपरिचय 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचतील अशा रितीने पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी लेखक बा. स. जठार यांच्याशी ( 9850393996, 9420436256 ) संपर्क साधावा.
पुस्तके पाठवणेचा पत्ता – सौ. रंजना बा. जठार, विद्यासागर निवास, शिंदेवाडी रोड, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर – 416209
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.