कापूस पिकामधील पाते व बोंड गळ
➢कारणे
👉🏽जास्त किंवा कमी झालेला पाऊस किंवा तापमानामध्ये झालेला चढउतार
👉🏽वाढीच्या अवस्थेत अन्नद्रव्यांसाठी होणारी पिकाची स्पर्धा
👉🏽किडींचा प्रादुर्भाव
👉🏽शेतात पाणी साचून राहणे किंवा जमिनीतील ओलावा कमी होणे
👉🏽सूर्यप्रकाशासाठी होणारी पिकाची स्पर्धा
➢ उपाययोजना
→आपत्कालीन परिस्थितीत योग्य अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापन करणे.
→जास्त पाऊस झाल्यास शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणे.
→एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे.
→नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एन.ए.ए.) २० पी.पी.एम. या प्रमाणात फवारणी करणे.
→वाढ नियंत्रण व शेंडा खुडणी करणे.
→पोटॅशियम नायट्रेटची १ टक्के प्रमाणे फवारणी करणे.
→पिकात हवा व सूर्यप्रकाश मुबलक राहील असे व्यवस्थापन करणे.
तूर पिक सल्ला
विषाणूजन्य रोग व त्यांचे व्यवस्थापन
⭕ वांझ रोग
रोपावस्थेत झाडाच्या पानांवर प्रथम गोलाकार पिवळे डाग पडतात. अशी पाने आकाराने लहान पडून कालांतराने आकसतात. पाने पिवळी पडून झाडांच्या दोन पेरातील अंतर कमी होऊन त्यांना अनेक फुटवे फुटून झाडांची वाढ खुंटते. रोगग्रस्त झाडांना फुले व शेंगा येत नाहीत. ती शेवटपर्यंत हिरवी राहून झुडपासारखी दिसतात. रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते पीक पक्व होण्याच्या अवस्थेपर्यंत कधीही होऊ शकतो. जास्त पाऊस, २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान व जास्त आर्द्रता रोगाच्या वाढीस पोषक आहेत.
🛡 उपाययोजना
👉🏾शेतात व बांधावर असलेली मागील हंगामातील तुरीची झाडे काढून टाकावीत. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये.
👉🏾रोगग्रस्त झाडे वेळोवेळी उपटून जाळून टाकावीत.
👉🏾रोगवाहक कीड ‘एरिओफाईड माईटस्च्या’ नियंत्रणासाठी, डायकोफॉल (१८.५ ईसी) २.५ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
⭕पर्णगुच्छ
या विषाणूजन्य रोगाचा प्रसार तुडतुड्यांमार्फत होतो. पर्णगुच्छयुक्त झाडे शेतामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आढळतात. झाडाच्या शेंड्याची वाढ थांबल्यामुळे आजूबाजूच्या फांद्या वाढतात. त्यामुळे झाडास पर्णगुच्छाचा आकार येतो. पीक फुलोऱ्यात असताना प्रादुर्भाव झाल्यास, फुलांची संख्या कमी होऊन ती छोट्या आकाराची, वाळलेली व पोपटी रंगाची दिसून येतात. शेंगा आकाराने लहान होऊन वेड्यावाकड्या स्वरूपात येतात. अशा शेंगांतील दाणे सुरकुतलेले दिसतात.
🛡 उपाययोजना
👉🏾रोगग्रस्त झाडे नष्ट करावीत.
👉🏾रोगवाहक किडीच्या नियंत्रणासाठी, डायमिथोएट (३० ईसी) १ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.३ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.