नाते मनात रहाते,
नाते सुंदर असते,
माय लेकींचे बाप मुलांचे,
गुजगोष्टी सांगते,
नाते..॥धृ॥
कर्तव्याचे भान ठेवूनी,
परस्परांचा मान राखूनी,
सहजहि निभवूनी जाते,
नाते..॥१॥
सुख दु:खाची सल जाणूनी,
सांत्वनांचे बोल बोलूनी,
अलगद संकट टळते,
नाते..॥२॥
नात्यांच्या या बंधनातूनी,
सुटू पाहता सुटे ना कुणी,
वीणहि घट्टच होते,
नाते..॥३॥
कवी – सौ.अंजली माधव देशपांडे.नाशिक.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.