April 5, 2025
Iffy 2024 Inclusion of Kabutar Webseries in Marathi in Film Bazaar
Home » इफ्फी 2024: फिल्म बाजारमध्ये मराठीतील कबूतर चित्रपटाचा समावेश
मनोरंजन

इफ्फी 2024: फिल्म बाजारमध्ये मराठीतील कबूतर चित्रपटाचा समावेश

इफ्फी 2024: फिल्म बाजारमध्ये मराठीतील कबूतर चित्रपटाचा समावेश

इफ्फी 2024: एनएफडीसी इंडियाद्वारे फिल्म बाजारमध्ये सह-निर्मिती बाजारासाठी निवड जाहीर

IFFIWood – गोवा – 18 व्या एनएफडीसी फिल्म बाजार ने सह-निर्मिती बाजारसाठी सात देशांतील 21 फीचर फिल्म्स आणि 8 वेब सीरिजची अधिकृत निवड जाहीर केली आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत (इफ्फी) दरवर्षी फिल्म बाजार आयोजित केला जातो. या वर्षी, फिल्म बाजार चे आयोजन 20 ते 24 नोव्हेंबर 2024 दरम्यान गोव्यातील मॅरियट रिसॉर्टमध्ये करण्यात आले आहे.

या वर्षीच्या अधिकृत निवडीमध्ये हिंदी, इंग्रजी, आसामी, तमिळ, मारवाडी, बंगाली, मल्याळम, पंजाबी, नेपाळी, मराठी, पहाडी आणि कँटोनीजसह भाषांचा समृद्ध पट उलगडला आहे. फिल्म बाजार मध्ये, भारत, बांगलादेश, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन , जर्मनी आणि हाँगकाँगमधील चित्रपट निर्माते, वितरक, फेस्टिव्हल प्रोग्रामर, फायनान्सर आणि सेल्स एजंट्ससह अनेक उद्योग व्यावसायिकांना त्यांचे प्रकल्प सादर करतील.

ओपन पिच सत्र हे चित्रपट निर्मात्यांसाठी संभाव्य सहयोग शोधण्याची एक विलक्षण संधी असल्याचे सिद्ध झाले आहे. या वर्षी सह-निर्मिती बाजारात आलेल्या चित्रपट आणि वेब सिरीजची यादी येथे आहे:

अनुक्रमांक चित्रपट/ वेब सिरीज देश/राज्य भाषा

1 अ नाईट व्हिस्पर्स अँड द विन्ड्स भारत आसामी

2 आदू कि कसम (डेस्टिनीज डान्स) भारत इंग्रजी/हिंदी

3 अनैकट्टी ब्लूज भारत तामिळ

4 ऍबसेन्ट भारत हिंदी/इंग्रजी

5 ऑल टेन हेड्स ऑफ रावणा भारत हिंदी

6 चेतक भारत हिंदी/मारवाडी

7 डिव्हाईन कॉर्ड्स बांगलादेश, भारत बंगाली

8 फेरल भारत इंग्रजी

9 गुलिस्तान (इयर ऑफ द विड्स) भारत हिंदी

10 गुप्तम (द लास्ट ऑफ देम प्लेग्ज) भारत मल्याळम

11 हरबीर भारत पंजाबी, हिंदी, इंग्रजी

12 होम बिफोर नाईट ऑस्ट्रेलिया, नेपाळ इंग्रजी, नेपाळी

13 कबूतर भारत मराठी

14 कोथियन- फिशर्स ऑफ मेन भारत मल्याळम

15 कुरिंजी (द डिसॅपरिंग फ्लॉवर) भारत, जर्मनी मल्याळम

16 बागी बेचारे (रिलक्टंट रिबेल्स) भारत हिंदी

17 रॉइड बांगलादेश बंगाली

18 सोमाहेलांग (द सॉंग ऑफ फ्लॉवर्स) भारत, ब्रिटन पहाडी, हिंदी

19 द एम्प्लॉयर भारत हिंदी

20 वॅक्स डॅडी भारत इंग्रजी, हिंदी

21 द व्याम्पायर ऑफ शेउंग शुई हॉंगकॉंग इंग्रजी, कॅण्टोनीज, हिंदी

22 एज ऑफ डेक्कन- द लिजेंड ऑफ मलिक अंबर भारत हिंदी, इंग्रजी

23 चौहान्स बीएनबी बेड अँड बसेरा भारत हिंदी

24 चेकवर भारत तामिळ, मल्याळम

25 इंडिपेन्डन्ट भारत, ब्रिटन इंग्रजी, तामिळ

26 जस्ट लाईक हर मदर भारत हिंदी, इंग्रजी

27 मॉडर्न टाइम्स भारत, ब्रिटन इंग्रजी, तामिळ

28 पॉंडि चेरी भारत हिंदी, इंग्रजी

29 रिसेट भारत तामिळ, हिंदी, तेलगू, कन्नड, मल्याळम

परस्पर आदानप्रदान उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या आशिया टीव्ही फोरम अँड मार्केट (एटीएफ) बरोबरची उत्साहवर्धक भागीदारी देखील या वर्षी आहे.वेब सिरीजची वाढती लोकप्रियता लक्षात घेत एनएफडीसी ने नाट्य, प्रेमकथा, ऐतिहासिक नाट्य, विनोद, ॲक्शन, कमिंग-ऑफ-एज, साहसकथा आणि रहस्यकथा अशा विविध शैलींमधील आठ आकर्षक प्रकल्प समाविष्ट केले आहेत.

“सह-निर्मिती बाजार हा फिल्म बाजारचा एक महत्त्वाचा भाग बनला असून यातून निवडक प्रकल्पांना मोलाचे आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते, अशी माहिती एनएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक प्रितुल कुमार यांनी दिली.या वर्षी, 23 देशांमधून 30 भाषांमध्ये प्रभावी 180 चित्रकृतींचे वैशिष्ट्यपूर्ण अर्ज प्राप्त झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. वेब सिरीज उद्घाटन आवृत्तीसाठी, आमच्याकडे 8 देशांमधून 14 भाषांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 38 कलाकृती दाखल झाल्या आहेत. निवड झालेल्या सर्व चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या कलाकृतीसाठी परिपूर्ण सह-निर्मिती भागीदार शोधण्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो!”,असेही ते म्हणाले.

फिल्म बाजार बद्दल अधिक माहिती:

2007 मध्ये आपल्या स्थापना झाल्यापासून, फिल्म बाजार दक्षिण आशियाई चित्रपट तसेच चित्रपट निर्मिती, निर्मिती आणि वितरणातील प्रतिभा शोधण्यासाठी तसेच समर्थन देण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी समर्पित आहे.फिल्म बझार दक्षिण आशियाई प्रदेशात जागतिक सिनेमांच्या विक्रीची सुविधा देखील प्रदान करतो तसेच दक्षिण आशियाई आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते, विक्री एजंट आणि सर्जनशील व्यक्ती आणि आर्थिक सहयोग शोधणारे महोत्सव आयोजक यांना एकत्र आणणारे स्थान म्हणून देखील काम करतो. फिल्म मार्केट या पाच दिवसांमध्ये, दक्षिण आशियाई आशय आणि प्रतिभेला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करते.सह – निर्मिती बाजाराचे उद्दिष्ट विविध जागतिक कथांवर प्रकाश टाकणे हे आहे.

इफ्फी बद्दल अधिक माहिती:

1952 मध्ये स्थापन झालेला, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) हा आशियातील प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. स्थापनेपासूनच इफ्फीचे उद्दिष्ट, चित्रपट, त्यांच्या मनमोहक कथा आणि त्यामागील प्रतिभावान व्यक्तींच्या कलागुणांचा गौरव करणे हे आहे. हा महोत्सव चित्रपटांबद्दलचे गाढ प्रेम आणि प्रशंसा वाढवण्याचा आणि चित्रपटांविषयी गोडी वाढवण्याचा , लोकांमध्ये समंजसपणाचे आणि सौहार्दाचे पूल बांधण्याचा तसेच प्रेक्षकांना वैयक्तिक आणि सामूहिक उत्कृष्टतेच्या नवीन उंचीवर पोहोचण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading