ना..ना..करते प्यार तुम्हीसे कर बैठे l
एक भारतीय राखी धनेश /Indian Grey Hornbill नर-मादीची जोडी दिसली. त्यातील नरानं एक किडा चोचीत पकडला (बहुदा भुंगा असावा). तो किडा प्रेमाची भेट म्हणून आपल्या मादीला देण्यासाठी त्यानं पकडला होता. ही भेट मादीनं स्वीकारावी म्हणून तो तिच्या लावण्या करीत होता. मादीनं दोनदा नकार दिला आणि तिसऱ्यांदा किडा स्वीकारला. निसर्गातील हे क्षण आपल्या मनाला निश्चितच आनंद देतात. हा आनंद शाश्वत राहावा यासाठी निसर्गाचे संवर्धन गरजेचे आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपणाला आनंद देऊन आपला कंटाळा घालवत असते. आपल्यात उत्साह निर्माण करत असते. यासाठीच निसर्ग वाचवायला हवा…
व्हिडिओ – शिल्पा गाडगीळ, जळगाव
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.