सोलापूर – करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्य कृतींना गावगाडा साहित्य पुरस्कार देण्यात येतो. यंदा कादंबरी व कविता संग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी दिली. यावेळी दिनेश आदलिंगे, डॉ जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ, बाबुराव इंगळे हे उपस्थित होते.
यंदा गावगाडा पुरस्काराचे 14 वे वर्ष आहे. यापूर्वी भागवत बावळे, प्रा.डाॅ.अर्जुन होटकर, कल्पना दुधाळ, पार्थ पोळके, सतीश दराडे, ऐश्वर्य पाटेकर, रावसाहेब कुंवर, तुकाराम पाटील, दिनकर कुटे, जयदीप विघ्ने, हरिश्चंद्र पाटील, डॉ. कालिदास शिंदे, बाबुराव इंगळे, तान्हाजी बोऱ्हाडे या साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी 1 जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेली कादंबरी व कविता संग्रहासाठी पुरस्कार देण्यात येणार असून साहित्यिकांनी साहित्यकृतीच्या दोन प्रती, अल्प परिचय, छायाचित्र पाठवावे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे असून साहित्यिकांनी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत साहित्यकृती पाठवावी, , असे आवाहन टकले यांनी केले आहे.
साहित्यकृती पाठविण्याचा पत्ता असा –
सोमनाथ मधुकर टकले मु. पोस्ट वडशिवणे, ता करमाळा, जि. सोलापूर पिन 413223
मोबाईल नंबर 9699760802
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.