कोल्हापूर – येथे ११ व १२ जानेवारी २०२५ दरम्यान वर्डकॅम्पचे आयोजन केले आहे. यामध्ये वेबसाईट संदर्भातील विविध विषयावरील तज्ज्ञ मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. वेबसाईटसाठीचा कंटेंट तयार करताना अनेक चुका होत असतात. या चुका कशा टाळायच्या ? यावर निकिता सावरकर या वर्डकॅम्पमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. निकिता यांच्या टिप्स ब्लॉगर्स, मार्केटर्स आणि वेबसाइट मालकांना त्यांचे कंटेंट सुधारण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणाऱ्या आहेत, यासाठी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
कंटेंट तयार करताना टाळावयाच्या चुका: माझ्या अनुभवातून घेतलेले धडे
या सत्रामध्ये, निकिता डिजिटल स्ट्रॅटेजीला हानी पोहोचवणाऱ्या सामान्य चुका यावर चर्चा करतील. त्या स्वतःच्या कथा आणि शिकलेल्या धड्यांचे अनुभव शेअर करतील. या चर्चेमध्ये चुकीचे कीवर्ड निवडणे, चांगल्या संरचनेची आणि कथाकथनाची उपेक्षा करणे यांसारख्या समस्यांचा समावेश असेल. हे सत्र कंटेंट क्रिएटर्सना अशा चुका टाळण्यास निश्चितच मदतगार ठरणारे आहे. सहभागी या सत्रामध्ये त्यांच्या प्रेक्षकांशी जोडणारे, सहभाग वाढवणारे, आणि उत्कृष्ट परिणाम साधणारे कंटेंट तयार करण्याचे मार्ग शिकता येतील.
निकिता सावरकर या तांत्रिक विषयांवरील लेखिका असून, वर्डप्रेस इकोसिस्टमसाठी प्रभावी लेखन तयार करण्याच्या क्षेत्रात त्यांना आठ वर्षांहून अधिक अनुभव आहे. संगणक तंत्रज्ञानामध्ये मास्टर्स पदवीधारक असलेल्या निकिताचा तंत्रज्ञानामध्ये मजबूत पाया असून, विविध प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या लेखनाची त्यांना उपजत आवड आहे.
निकिता २०१७ पासून वर्डप्रेस नागपूर कम्युनिटीच्या सक्रिय सदस्य आहेत. वर्डकॅम्प नागपूरसारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी या कम्युनिटीच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नागपूरमधील ऑफिस इंडिया या कोवर्किंग स्पेसच्या सहसंस्थापिका म्हणून, त्या स्टार्टअप्स आणि फ्रीलान्सर्सना सहयोग व नाविन्यपूर्णतेसाठी पाठिंबा देतात.
व्यावसायिक कार्याबाहेर, निकिता या समर्पित कथक नर्तिका, वर्डकॅम्प उत्साही, पुस्तकप्रेमी, आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी दृढ समर्थक आहेत. त्यांच्या सखोल ज्ञानाने आणि संवाद कौशल्याने, त्या प्रत्येक कार्यक्रमात श्रोत्यांना प्रेरित करण्याचा आणि माहिती देण्याचा प्रयत्न करतात.
वर्डकॅम्पच्या अधिक माहितीसाठी https://kolhapur.wordcamp.org/2025/ या संकेतस्थळास भेट द्या.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.