सांगली – महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इस्लामपूरने २०२५ मध्ये भारतात आणि परदेशातही प्रसिद्ध होणाऱ्या मराठी दिवाळी अंकासाठी ‘आंतरराष्ट्रीय मराठी दिवाळी अंक स्पर्धा २०२५’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती स्पर्धेचे संयोजन प्रा. शामराव पाटील (अण्णा) यांनी दिली आहे.
उत्कृष्ट दिवाळी अंकाकरीता प्रथम पारितोषिक ₹५००१ /- व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक ₹ ३००१ /- व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक ₹ २००१ /- व सन्मानचिन्ह याप्रमाणे पुरस्कार देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त अन्य तीन उत्तेजनार्थ दिवाळी अंकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. या दिवाळी अंक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संबंधितांनी दिवाळी अंकांच्या दोन प्रती १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील उत्कृष्ट दिवाळी अंकांची निवड ही नामवंत परिक्षकांकडून केली जाणार आहे. प्रा. शामराव पाटील (अण्णा), मसाप इस्लामपूरचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक स्वामी, प्रा. सुनील पाटील, धर्मवीर पाटील, आनंदहरी, डॉ. अर्चना थोरात, प्रा. शैलजा यादव-पाटील आदींनी या स्पर्धेचे संयोजन केले आहे. स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी ९५११८३७८७९ ; ७५८८५८६६७६ तसेच ८२७५१७८०९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
दिवाळी अंक पाठविण्याचा पत्ता –
मा. अध्यक्ष,
महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा – इस्लामपूर
द्वारा :- राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी, दिवाण बंगला, इस्लामपूर जि. सांगली ( महाराष्ट्र ) ४१५४०९
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
