पुणे – मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्यावतीने संत वाङ्मय अभ्यासावर आधारित साहित्यास पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी दोन सौर वर्षात प्रकाशित संत विषयक मराठी साहित्याचा विचार केला जाणार आहे. तरी इच्छुकांनी प्रकाशित पुस्तके पाठवावीत असे आवाहन संस्थेचे कार्यवाह य. ल. लिमये व सुहास कुलकर्णी यांनी केले आहे.
दरवर्षी मातृमंदिरच्यावतीने सौर १ मार्गशीर्ष ( २२ नोव्हेबर) रोजी निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयात हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. या पुरस्कारासाठी दोन सौर वर्षात प्रकाशित झालेले संत साहित्य पाठवावे. संत साहित्याचे परीक्षण ( टीका, विवेचन), संतचरित्रे, संतांच्या कार्यावरील विवेचनात्मक लेखन, संत जीवनावर आधारित ललित साहित्य ( कथा, कादंबरी, काव्यकोश) आदी सर्व प्रकारच्या साहित्याचा यात समावेश आहे. १०० पेक्षा अधिक पृष्ठांच्या मोठ्या सर्वोत्कृष्ट दोन पुस्तकांच्या लेखकांना अनुक्रमे १० हजार रुपये आणि ८ हजार रुपये असे दोन पुरस्कार ( ६० टक्के रक्कम लेखकास तर ४० टक्के रक्कम प्रकाशकास) दिले जाणार आहेत. त्याशिवाय बालवाङ्मयातील (१०० पृष्ठांच्या आतील) संतकथा, संतचरित्र, संतवचनसंग्रह अशा स्वरुपातील पुस्तकांना प्रत्येक २५०० रुपये असा पुरस्कार देण्यात येणार आहे.
तरी या पुरस्कारसाठी पुस्तकाच्या दोन प्रती ३१ ऑगस्टपर्यंत मातृमंदिर विश्वस्त संस्था, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, पेठ क्र. २५, निगडी, प्राधिकरण, पुणे ४११०४४ या पत्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी 97651 35769 या क्रमांकावर संपर्क करावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
मला या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे.