पुणेः निगडी प्राधिकरण येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे प्रतिवर्षी संत वाड्.मय पुरस्काराचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचे यंदाचे हे २५ वे (रौप्यमहोत्सवी ) वर्ष आहे. त्यासाठी एकूण २८ पुस्तके यावर्षी परीक्षणासाठी संस्थेकडे आली होती. याचे परीक्षण डॉ. सुनीताताई जोशी आणि माधवीताई महाजन या दोन परीक्षकांनी केले.
पुरस्कार प्राप्त पुस्तके अशी –
गट क्र . १ ( चिंतनपर, विवेचनपर पुस्तके)
(पुरस्कार रक्कम लेखकांना ६० % आणि प्रकाशकांना ४० % दिली जाते .)
प्रथम क्रमांक ( पुरस्कार रु.८०००/-)
पंचलतिका, लेखक : शुभदा मुळे. प्रकाशक : श्रीरंग प्रकाशन, पुणे
द्वितीय क्रमांक ( पुरस्कार रु. ६०००/-) –
अष्टावक्र गीता आणि अमृतानुभव – लेखक : डॉ. सुधाकर नायगावकर ( मुंबई ), प्रकाशक : स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
तृतीय क्रमांक ( पुरस्कार रु.४०००/-) विभागून
१) भारतीय कुंभार समाजातील संत, लेखक : प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर, प्रकाशक : स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
२) संत तुकाराम महाराज आणि त्यांची विठ्ठलभक्ती, लेखक : डॉ. अनिता आढाव – – नरसाळे, प्रकाशक : वेदान्तश्रीः प्रकाशन, पुणे
विशेष पुरस्कार (पुरस्कार रु. ३०००/- फक्त लेखकासाठी)
१ ) कबीर एक दार्शनिक ग्रंथ – लेखक: महंत डॉ. संजय एस. सर्वे नागपूर, प्रकाशक : कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
२) चांगदेव पासष्टी – लेखक : सुभाष महाराज गेठे, आळंदी, प्रकाशक : जानकी वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान, आळंदी
गट क्र. २ ( संत जीवन-ललित साहित्य )
१) समर्थशिष्य कल्याण – लेखक : अनुराधा फाटक, पुणे. प्रकाशक : रावा प्रकाशन, कोल्हापूर
( पुरस्कार रक्कम रु. २०००/- प्रति पुस्तक )
उत्तेजनार्थ पुरस्कार
१) श्री संत चोखामेळा व परिवार – लेखक/संपादक : डॉ. ॐ श्रीश दत्तोपासक, प्रकाशक : संत चोखामेळा अध्यासन केंद्र,
२) समर्थांच्या अभंग गाथेतील रामायण – लेखक : सौ. वीणा शंकर तळघत्ती, पुणे, प्रकाशक : शंकर रामचंद्र तळघत्ती, पुणे
पुरस्कार वितरण बुधवार सौर १ अग्रहायण शके १९४५ (दि. २२ नोव्हेंबर २०२३ ) या दिवशी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत मनोहर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी, पुणे ४४ येथे होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अभ्यागत म्हणून डॉ. अजित महादेव कुलकर्णी, माजी रजिस्ट्रार, बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कार्यवाह म.व.देवळेकर यांनी दिली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.