अद्याक्षरापासून कविता ..मोबाईल
मो….मोहून टाकते मन
असे यंत्र
तोडून टाकते जन
असे याचे तंत्र
बा….बातचीत सुद्धा
होत नाही एकमेकांत
हातात असला फोन की
हवा असतो फक्त एकांत
ई….ईश्वराची प्रार्थना
तो ही स्टेटस…
भरपूर लाईक्स मिळाव्या
याची हि आस
ल… लक्षात असू द्या हे ही
मोबाईल नाही आपल्यासाठी
सर्व काही……..
” मोबाईल ” मुळे ना होते
आपले चालणे…….
ना इतरांशी काही बोलणे…..
ना अंगणातील खेळ
ना बसतो इथे एकमेकांचा ताळमेळ
बसलो घरात जरी सगळे एकत्र
तरी फक्त चाले इथे मोबाईलचेच सत्र
गुगल मॅप अनेक शैक्षणिक ॲप द्वारे
फायदेही आहेत खूप न्यारे. …
शिकून घेऊ या मग आपण ते सारे
असे चांगले आगळे वेगळे लागू दे
आपणालाही मग मोबाईलचे वारे
सौ निर्मला कुंभार
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
