कोल्हापूर – कोनवडे (ता. भुदरगड ) येथील गुरव परिवाराच्यावतीने मातोश्री रेखा गुरव वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यंदा देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा रवींद्र गुरव, राजेंद्र गुरव यांच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच या पुरस्कारांचे वितरण एक जुन रोजी कोनवडे येथील शाहू प्रबोधिनी स्कूलमध्ये होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक कृष्णात खोत, तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी गोविंद पाटील असणार आहेत. तसेच डॉ. चंद्रशेखर कांबळे व राजन कोनवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
साहित्यव्रती पुरस्कार फलटण येथील सुरेश शिंदे यांना देण्यात येणार आहे. उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार कपिलेश्वर येथील पांडुरंग मुरारी पाटील यांच्या नागरमुठी या कादंबरीस, तर उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार वाशिम येथील गजानन शिले यांच्या थकीत एकूण गोषवारा या काव्यसंग्रहास, तर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार झुरळ आणि इतर काहीबाही या भंडारा येथील प्रमोदकुमार अणेराव यांच्या कथासंग्रहास देण्यात येणार आहे. तसेच विशेष पुरस्कार साजंडच्या लेखिका सुचित घोरपडे यांना देण्यात येणार आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
