November 21, 2024
Send books for Vachankatta State Level Literary Award
Home » वाचनकट्टा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवा
काय चाललयं अवतीभवती

वाचनकट्टा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवा

वाचनकट्टा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवा

कोल्हापूर – साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण व समाजकारण या क्षेत्रात गेल्या दहावर्षांपासून काम करणारी कोल्हापूर येथील वाचनकट्टा बहूउद्देशीय संस्था 2022 पासून वाचनकट्टा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देते. अशा विविध साहित्यकृतीतील पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. अशी माहिती वाचनकट्ट्याचे अध्यक्ष युवराज कदम यांनी दिली आहे.

या पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत निर्मित ग्रंथ/पुस्तके ग्राह्य असतील. पुरस्कार मार्च/एप्रिल महिन्याच्या अखेरीस घोषित करण्यात येतील. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, मानपत्र व  पुस्तके असे असेल. कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, गौरवग्रंथ, समीक्षा व वैचारिक लेखन, दिवाळी अंक यासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठीची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2024 ही आहे.



देण्यात येणारे पुरस्कार असे : उत्कृष्ट गद्य साहित्य पुरस्कार, उत्कृष्ट संकीर्ण साहित्य पुरस्कार, उत्कृष्ट पद्य साहित्य पुरस्कार, उत्कृष्ट संशोधन साहित्य पुरस्कार, वाचनकट्टा विशेष साहित्य पुरस्कार -2023

तरी इच्छुकांनी पुस्तकाच्या दोन प्रती व लेखकाचा परिचय १५ फेब्रुवारी २०२४ पूर्वी वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, फ्लॅट नं. 3, आनंदी-विजय अपार्टमेंट, माऊली चौक, राजारामपुरी 13 वी गल्ली, कोल्हापूर – 416 008 या पत्त्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी युवराज कदम मो-9422138237 यांच्याशी संपर्क साधावा. 


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading