September 8, 2024
Sunetra Vijay Joshi Poem Nav Tyache Lavte
Home » नाव त्याचे लावते…
कविता

नाव त्याचे लावते…

नाव त्याचे लावते…

बांधुनी काळे मणी ती नाव त्याचे लावते
यामुळे का त्यास पत्नी मालकीची वाटते

का नको तेथेच लोकांची नजर रेंगाळते
ती बिचारी लाज उघडी फाटक्याने झाकते

पोट भरण्याचा तिला पर्याय मिळतो शेवटी
चाळ पायी बांधुनी लोकांपुढे ती नाचते

न्याय पैशाने विकत मिळतो तिने हे पाहिले
फाटकी झोळी तिची अन्याय सोसत राहते

आंधळ्या प्रेमात त्याच्या सत्य बघणे टाळते
तो चुका करतो तरी ती नित्य पोटी घालते

सौ सुनेत्रा विजय जोशी 
रत्नागिरी

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

ब्रह्मसंपन्नतेवर प्रत्येकाचाच अधिकार

प्रशासक जिजाऊ अन् आज्ञापत्र

अध्यात्म चिंतामुक्त जीवन जगण्यास शिकवते

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading